अभिनेत्री सोनम कपूरच्या अभिनय आणि सौंदर्याने आता निर्माता सूरज बडजात्याला भुरळ घातली आहे. सूरजच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात सोनम काम करीत आहे. सलमान खान हा या चित्रपटात तिचा हीरो आहे. ‘सोनम ही एक जबरदस्त अभिनेत्री आहे. वेगळे काही करून दाखविण्याची तिची नेहमी इच्छा असते. माङया चित्रपटासाठी आवश्यक असणा:या सर्व गोष्टी तिच्यात आहेत. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला आहे. सोनमही टिपिकल भारतीय अभिनेत्री असून, तिच्यासोबत पहिल्यांदा काम करीत आहे, असे कदापि वाटत नाही, अशा शब्दात सूरज बडजात्याने सोनमवर स्तुतिसुमने उधळली आहेत.