Join us

सोनालीच्या मुलीची ट्रेन सफर

By admin | Updated: February 26, 2016 03:35 IST

लहान मुलांना शाळेत ‘झुक झुक झुक झुक आगीनगाडी’ हे गाणे शिकविले जाते. त्या आगीनगाडीत बसण्याची सर्वच मुलांची इच्छा असते. कार अन् प्लेनने प्रवास करणाऱ्या मुलांच्या

लहान मुलांना शाळेत ‘झुक झुक झुक झुक आगीनगाडी’ हे गाणे शिकविले जाते. त्या आगीनगाडीत बसण्याची सर्वच मुलांची इच्छा असते. कार अन् प्लेनने प्रवास करणाऱ्या मुलांच्या नशिबी ट्रेनची सफर करण्याची मजाच नसते. देश-विदेशात विमानाने शूटिंगसाठी, हॉलिडेसाठी फिरणाऱ्या सोनाली कुलकर्णीने मात्र तिच्या लेकीची ट्रेनमध्ये बसण्याची हौस पूर्ण केली आहे. सिंहगड एक्स्प्रेसने दादर टू पुणे हा प्रवास दोघी मायलेकींनी पुरेपूर एन्जॉय केला आहे. सोनाली आणि तिची मुलगी कावेरीने ट्रेनच्या बोगीमध्ये, प्लॅटफॉर्मवर मस्त फोटोदेखील काढले आहेत. मुलीचा पहिलाच ट्रेनचा प्रवास असल्याने फिलिंग नॉस्टॅल्जिक असेही सोनालीने म्हटले होते.