Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली कुलकर्णीवर चाहत्यांचा प्रेमाचा पाऊस

By admin | Updated: March 28, 2016 00:19 IST

मराठी इंडस्ट्री व बॉलीवूड या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजविणारी सुंदर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या चाहत्यांनी इन्स्टाग्रॅम या सोशल

मराठी इंडस्ट्री व बॉलीवूड या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजविणारी सुंदर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या चाहत्यांनी इन्स्टाग्रॅम या सोशल मीडियावर नुकतेच खूप कमी कालावधीत ५० हजारांचा टप्पा पार करीत तिच्यावर अक्षरश: प्रेमाचा पाऊस पाडला आहे. मराठीमध्ये सोनालीने ‘अगं बाई अरेच्चा २’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘पुणे ५२’, ‘देऊळ’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तर बॉलीवूडमध्येदेखील ‘दिल चाहता है’, ‘सिंघम’, ‘टॅक्सी नंबर ९२११’ यांसारख्या बिग बजेट चित्रपटांतून बॉलीवूडच्या तगड्या कलाकारांसोबत ती झळकली होती. चाहत्यांच्या या प्रेमाचे आभार मानताना सोनालीने इन्स्टाग्रॅमवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून सोनाली म्हणते, की प्रत्येक चाहत्याने दिलेल्या प्रेमापोटी आज मी ५० हजारांचा टप्पा पार केला आहे. चाहत्यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच तुमचे प्रेम व पाठिंबा असाच सदैव माझ्या पाठीशी राहू दे. असो. सोनालीला तिच्या चाहत्यांनी दिलेल्या भरभरून प्रेमासाठी ‘लोकमत सीएनएक्स’च्या वतीनेदेखील शुभेच्छा.