Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली झाली साडी डिझायनर

By admin | Updated: October 28, 2016 04:21 IST

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला सतत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपण पाहिले आहे. आता सोनाली पुन्हा एकदा नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे. ती ड्रेस डिझायनर

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला सतत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपण पाहिले आहे. आता सोनाली पुन्हा एकदा नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे. ती ड्रेस डिझायनर झाली आहे. नुकतीच सोनालीने एक झक्कास साडी डिझाईन केली आहे. स्वत: डिझाईन केलेल्या नेटेड साडीचा फोटो नुकताच सोनालीने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. ती उत्तम अभिनेत्री आहेच; परंतु ती चांगली डिझायनरदेखील असल्याचे आता समोर आले आहे. सोनालीच्या या हिडन टॅलेंटचे तिचे चाहते नक्कीच कौतुक करतील. सोनाली अभिनयासोबत तिचा हा ड्रेस डिझायनिंगचा छंद जोपासत आहे. सोनालीने जर चित्रपटांसाठी डिझायनर म्हणून काम केले, तर आश्चर्य वाटायला नको. एखाद्या चित्रपटात तीने डिझाईन केलेले कपडे कलाकारांच्या अंगावर प्रेक्षकांना दिसू शकतील. आता डिझायनर म्हणून ती स्वत:चा वेगळा ठसा इंडस्ट्रीत उमटविणार का, हे समजेल.