Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली बेंद्रेच्या तब्येतीविषयी तिची मैत्रीण नम्रता शिरोडकरने केला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 16:07 IST

नुकतेच बॉलिवूडची अभिनेत्री नम्रता शिरोडकरने सोनालीची भेट घेतली. नम्रता गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असली तरी आजही सोनाली आणि नम्रता यांची खूप चांगली मैत्री आहे.

सोनाली बेंद्रे सध्या अमेरिकेत कॅन्सर या आजारावर उपचार घेत आहे. सोनालीची कॅन्सरशी झुंज सुरू असल्याची माहिती तिने स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. सोनाली न्यूयॉर्कला उपचारासाठी रवाना झाल्यापासून बॉलिवूडमधील तिच्या अनेक मित्रमैत्रिणी तिची भेट घेत आहे. नुकतेच बॉलिवूडची अभिनेत्री नम्रता शिरोडकरने सोनालीची भेट घेतली. नम्रता गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असली तरी आजही सोनाली आणि नम्रता यांची खूप चांगली मैत्री आहे. त्यामुळे नम्रता आपल्या या लाडक्या मैत्रिणीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेली होती.

सोनालीला भेटल्यानंतर नम्रताने एका वर्तमानपत्राला मुलाखत दिली असून त्यात म्हटले आहे की, सोनाली ही खूप शूर मुलगी आहे. ती आता खूप फिट दिसत असून ती लवकरच तिच्या नार्मल आयुष्यात परतणार आहे. आम्ही दोघींनी मिळून खूप साऱ्या गप्पा मारल्या. तिने तिच्या आजारपणाविषयी सगळे काही मला सांगितले. या आजारावर मात करण्यासाठी तिने कशी हिंमत एकवटली हे देखील मला सांगितले. माझ्या प्रार्थना नेहमीच तिच्यासोबत असणार असल्याचेही मी तिला सांगितले. 

नम्रता सध्या तिचा पती दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूसोबत अमेरिकेला फिरायला गेली आहे. त्यांची दोनी मुलं देखील त्यांच्यासोबतच आहेत. सोनाली आणि नम्रता या दोघी मराठी असल्याने त्यांचे बाँडिंग खूपच छान आहे. 

प्रियांका चोप्राच्या ब्रायडल शॉवर पार्टीला सोनालीने नुकतीच हजेरी लावली होती. तसेच सरोद वादक अमजद अली खान यांच्या एका कार्यक्रमाला देखील ती उपस्थित राहिली होती. 

सोनालीने एका पोस्टद्वारे तिला कॅन्सर झाल्याचे चाहत्यांना सांगितले होते. तिने पोस्टमध्ये लिहिले होते की, ''कधी कधी आयुष्यात अनपेक्षित वळणं येतात, ज्याबाबत आपण कधीही विचार केलेला नसतो. मला हायग्रेड कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार मला आजाराविरोधात लढण्याचे बळ देताहेत. या गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी मी न्यूयॉर्कला आले आहे. सतत शारीरिक वेदना होत असल्याच्या कारणामुळे काही वैद्यकीय तपासण्या केल्या. यामध्ये मला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या आजाराला सामोरं जाण्यासाठी मी सज्ज आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत''. 

सोनालीची ही पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला होता.  

टॅग्स :सोनाली बेंद्रेनम्रता शिरोडकर