Join us

मी वाचेन याची शाश्वती नव्हती...! सोनाली बेंद्रेने शेअर केला कॅन्सरचा प्रवास!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 15:33 IST

अलीकडे एका ताज्या मुलाखतीत सोनालीने कॅन्सरच्या प्रवासाबद्दल सांगितले. कॅन्सरला कशी सामोरी गेलीस, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना सोनाली कमालीची भावूक झाली.

ठळक मुद्देकॅन्सरशी झुंज सोपी नव्हती. पण या आजाराने मला खूप काही शिकवले. जगात माणुसकी आजही जिवंत आहे, हे मला प्रकर्षाने जाणवले, असे ती म्हणाली.

गत वर्षी सोनाली बेंद्रेला कॅन्सरचे निदान झाले आणि चाहत्यांत चिंता पसरली. कॅन्सरच्या निदानानंतर सोनाली उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाली. या काळात सोनालीने अतिशय धैर्याने या आजाराशी झुंज दिली आणि अखेर पूर्णपणे स्वस्थ होऊन भारतात परतली. आता तर ती कामावरही परतली आहे. अलीकडे एका ताज्या मुलाखतीत सोनालीने कॅन्सरच्या प्रवासाबद्दल सांगितले. कॅन्सरला कशी सामोरी गेलीस, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना सोनाली कमालीची भावूक झाली.

‘कॅन्सरचे निदान हा माझ्यासाठी धक्का होता. पुढचा प्रवास कसा असेल, या विचाराने माझी तहान-भूक हरवली होती. या आजारासाठी मीच जबाबदार आहे, असा विचार करून करून मी दिवसरात्र रडायचे. स्वत:ला दोष द्यायचे.  न्यूयॉर्कमध्ये उपचारासाठी गेल्यावर मानसोपचार तज्ज्ञाने ने मला यातून मला बाहेर काढले. उपचारादरम्यान माझ्यावर एक मोठी सर्जरी करावी लागणार होती. यातून मी वाचेल की नाही, याचीही शाश्वती नव्हती. माझ्या मुलाला मी पुन्हा पाहू शकेल की नाही, हीही शाश्वती नव्हती. सर्जरीला जाताना माझ्या बहिणीने मला घट्ट मिठी मारली. तो क्षण माझ्यासाठी प्रचंड वेदनादायी होता. सुदैवाने ती सर्जरी यशस्वी झाली आणि मी जिवंत परतले,’ असे सोनालीने सांगितले. हे सांगताना तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

कॅन्सरशी झुंज सोपी नव्हती. पण या आजाराने मला खूप काही शिकवले. जगात माणुसकी आजही जिवंत आहे, हे मला प्रकर्षाने जाणवले, असे ती म्हणाली.  सोनालीवरचे उपचार अद्याप पूर्ण झाले नाहीत. मात्र, ती तिचा वेळ तिच्या कुटुंबासोबत घालवण्यासाठी मायदेशात परतली आहे. 

टॅग्स :सोनाली बेंद्रे