Join us  

राज ठाकरेंमुळे सोनाली बेंद्रेने दिला 'छम छम करता है' गाण्याला होकार, केदार शिंदेंचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 3:00 PM

राज ठाकरेंमुळे सोनाली बेंद्रेने दिलेला 'अगं बाई अरेच्चा'ला होकार, केदार शिंदेंचा खुलासा, म्हणाले, "छम छम करता है गाण्यासाठी..."

सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक केदार शिंदे त्यांच्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. बॉलिवूड सिनेमांना टक्कर देत बाईपण बॉक्स ऑफिसवर भारी पडत आहे. बाईपणच्या आधी केदार शिंदेंचा 'अगं बाई अरेच्चा' हा सिनेमा प्रचंड गाजला होता. या सिनेमाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. 'बाईपण भारी देवा'च्या यशानंतर दिलेल्या एका मुलाखतीत केदार शिंदेंनी 'अगं बाई अरेच्चा' चित्रपटावर भाष्य केलं. या चित्रपटाच्या यशाचं श्रेय त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलं. 

"अगं बाई अरेच्चा केला तेव्हा मी २८ वर्षांचा होतो. या सिनेमाचं श्रेय मी राज ठाकरेंना देईन. ते माझे मित्र, फिलोसोफर आणि मार्गदर्शक आहेत. हे मी राजकीयदृष्ट्या बोलत नाहीये. कलाकार राज ठाकरेंबद्दल मी हे बोलत आहे. तेव्हाच्या कल्पना, अनुभव वेगळा होता. मी लिहायचो आणि त्यांना वाचून दाखवयचो. त्यात मग ते मला सूचना द्यायचे. २००४साली मी एवढा मोठा सिनेमा केला, हे आज अगं बाई अरेच्चा बघताना मला जाणवतं. राज ठाकरेंमुळे हा सिनेमा मोठा झाला. त्यांनी त्यावेळचे गृहमंत्री आबा पाटील यांना फोन केला होता," असं केदार शिंदे महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

"मला राजकारणात यायचं आहे", केदार शिंदेंचं वक्तव्य, म्हणाले, "राज ठाकरेंसाठी..."

'अगं बाई अरेच्चा' चित्रपटातील 'छम छम करता है' हे आयटम साँग खूप हिट झालं होतं. या गाण्याला फराह खानने कोरिओग्राफ केलं होतं. तर बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे या गाण्यावर थिरकताना दिसली होती. राज ठाकरेंमुळे सोनाली बेंद्रे आणि फराह खानने या चित्रपटासाठी होकार दिल्याचा खुलासा केदार शिंदेंनी या मुलाखतीत केला.  ते म्हणाले, "छम छम करता है गाण्यासाठी फराह खान आणि सोनाली बेंद्रेने राज ठाकरेंमुळे होकार दिला. त्यांच्या एका शब्दामुळे त्यांनी हा सिनेमा स्वीकारला."

'ओपेनहायमर'मध्ये इंटिमेट सीन दरम्यान भगवद्गीतेचं वाचन, 'महाभारत' फेम अभिनेता म्हणाला...

दरम्यान, आता केदार शिंदेचा 'बाईपण भारी देवा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने २४ दिवसांत ६५. ११ कोटींची कमाई केली आहे. सहा बहिणींच्या बाईपणाची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद पाहून केदार शिंदेही भारावून गेले आहेत. 

टॅग्स :केदार शिंदेराज ठाकरेसोनाली बेंद्रेमराठी चित्रपट