Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली कुलकर्णीचा बिकिनी व्हिडीओ व्हायरल, वाढदिवसानंतर चाहत्यांचे मानले आभार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:21 IST

सोनाली बिकिनी लूकमध्ये समुद्रकिनारी दिसली.

मराठी इंडस्ट्रीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते. नुकतंच अभिनेत्रीनं १८ मे रोजी अभिनेत्री ३७ वा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांकडून तिला सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव झाला. या प्रेमळ शुभेच्छांचा स्वीकार करत सोनालीने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती बिकिनी लूकमध्ये समुद्रकिनारी दिसली. हा व्हिडीओ शेअर करत तिने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. "तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद" असं कॅप्शन दिलं आहे. सोनालीचा हा बोल्ड लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 

दरम्यान, ही पहिलीच वेळ नव्हे जेव्हा सोनालीने बोल्ड फोटो शेअर केले आहेत. याआधीही तिचे बोल्ड फोटो व्हायरल झाले आहेत. सोनाली सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. सोनालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती दरम्यान दीर्घकाळापासून कोणत्या सिनेमात झळकलेली नाही, प्रेक्षकांना तिच्या आगामी सिनेमांची प्रतिक्षा आहे.

टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटी