दिग्दर्शक आर. मुरुगादॉस यांच्या ‘हॉलीडे’ या चित्रपटात हिरोईनच्या भूमिकेत दिसलेली सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा मुरुगादॉस यांच्या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. हा एक महिलाप्रधान चित्रपट असून या चित्रपटात सोनाक्षीचे बरेच अॅक्शन सीन्स असणार आहेत. सोनाक्षीचे अॅक्शन सीन्स केरळच्या पारंपरिक मार्शल आर्टवर आधारित असणार आहे. सोनाक्षीने या चित्रपटाची तयारीही सुरू केली आहे. या चित्रपटासाठी ती 3क् दिवसांच्या वर्कशॉपमध्ये सहभागी होणार आहे. या चित्रपटाबाबत बोलताना मुरुगादॉस म्हणाले की, ‘चित्रपटाची कथा मला खूप आवडली आहे, चित्रपट भारतीय महिलांना एक दमदार संदेश देईल. चित्रपटात सोनाक्षी एका कॉलेज गर्लच्या भूमिकेत आहे.’