Join us
Daily Top 2Weekly Top 5

सर्व अभिनेत्यांसोबत काम करणार सोनाक्षी

By admin | Updated: October 11, 2014 04:52 IST

बॉलीवूडची दबंग लेडी सोनाक्षी सिन्हा सांगते की, बॉलीवूडच्या त्या प्रत्येक कलाकारासोबत तिला काम करायचे आहे, ज्यांच्याबरोबर अद्याप तिने काम केले नाही.

बॉलीवूडची दबंग लेडी सोनाक्षी सिन्हा सांगते की, बॉलीवूडच्या त्या प्रत्येक कलाकारासोबत तिला काम करायचे आहे, ज्यांच्याबरोबर अद्याप तिने काम केले नाही. तिच्या मते, कलाकारांबद्दल तिची विशिष्ट अशी लिस्ट नाही. सोनाक्षी म्हणते, ‘मला त्या सर्वांसोबत काम करायचे आहे, ज्यांच्यासोबत काम करायची संधी मला अद्याप मला मिळाली नाही; पण ज्यांच्यासोबत काम केले आहे, त्यांच्याबरोबर पुन्हा काम करणेही मला आवडेल.’ काही दिवासांपूर्वी सोनाक्षीने अरबाज खानचा चित्रपट नाकारला होता, तेव्हा सोनाक्षी-सलमानमध्ये मतभेद झाल्याचे सांगितले जात होते. यावर सोनाक्षीने उत्तर दिले की, ‘माझ्यात आणि सलमानमध्ये काहीही मतभेद नाहीत, कधी होणारही नाहीत.