Join us

अमृता प्रीतमच्या भूमिकेत सोनाक्षी

By admin | Updated: October 8, 2014 00:34 IST

बाँबे टॉकीजसारख्या चित्रपटाचा दिग्दर्शक आशी दुआ याने नुकतेच सोनाक्षी सिन्हाला त्यांच्या आगामी चित्रपटात अमृता प्रीतमची भूमिका निभावण्यासाठी संपर्क साधला असल्याची बातमी आहे

बाँबे टॉकीजसारख्या चित्रपटाचा दिग्दर्शक आशी दुआ याने नुकतेच सोनाक्षी सिन्हाला त्यांच्या आगामी चित्रपटात अमृता प्रीतमची भूमिका निभावण्यासाठी संपर्क साधला असल्याची बातमी आहे. हा चित्रपट साहीर लुुधियानवी आणि अमृता प्रीतम यांच्या लवस्टोरीवर आधारित आहे. सोनाक्षीच्या एका निकटवर्तीय सूत्रानुसार सोनाक्षीला या चित्रपटात कास्ट करण्यासाठी संपर्क करण्यात आला आहे. यापूर्वी या दिग्दर्शकाने ही भूमिका प्रियंका चोप्राला आॅफर केली होती; पण प्रियंकाने चित्रपटाला नकार दिला आहे. इरफान खानला साहीर लुधियानवींच्या भूमिकेत कास्ट करण्यात आले होते; पण इरफानही या चित्रपटातून बाहेर पडला आहे, त्यामुळे साहीर आणि अमृतासह अखेरच्या क्षणापर्यंत सोबत करणारे इमरोज यांच्या भूमिकेसाठीही अभिनेत्यांचा शोध सुरू आहे.