Join us

सोनाक्षी आता ‘अकिरा’मध्ये बिझी

By admin | Updated: March 22, 2015 23:21 IST

‘अ‍ॅक्शन जॅक्सन’नंतर काही काळ विश्रांती घेत सोनाक्षी सिन्हाने आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

‘अ‍ॅक्शन जॅक्सन’नंतर काही काळ विश्रांती घेत सोनाक्षी सिन्हाने आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. दक्षिणेतील ‘मौनागुरू’ या सुपरहिट चित्रपटाचा ‘अकिरा’ हा हिंदी रीमेक असणार आहे. चित्रपटाची शूटिंग पुणे, मुंबई, राजस्थान शहरांमध्ये होणार आहे. मुरुगदासचा लाइव्ह लोकेशनवर शूटिंग करण्यावर जास्त भर असल्याने मुंबईतील गर्दीच्या भागांत अथवा राजस्थानच्या शहरांमध्ये सोनाक्षी लवकरच शूटिंग करताना दिसेल.