Join us

सोनाक्षीला आवडतात आव्हाने

By admin | Updated: October 3, 2014 23:55 IST

आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात असे सोनाक्षी सिन्हाचे म्हणणो आहे. तिने नुकतेच ए.आर. मुरुगादॉस यांचा एक महिलाप्रधान चित्रपट साईन केला आहे.

आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात असे सोनाक्षी सिन्हाचे म्हणणो आहे. तिने नुकतेच ए.आर. मुरुगादॉस यांचा एक महिलाप्रधान चित्रपट साईन केला आहे. अॅक्शन चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याने हा चित्रपट स्वीकारल्याचे सोनाक्षीने म्हटले आहे. अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग प्रोजेक्टस् करायचे असून गेल्या काही चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्याचे ती सांगते. जेव्हा सोनाक्षीला तिच्या खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने उत्तर दिले की, सध्या तिच्याकडे खूप काम असून इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे ती म्हणाली. सध्या सोनाक्षी अॅक्शन ज्ॉक्सन, लिंगा आणि तेवर या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.