सध्याच्या टेक्नो सॅव्ही शहरात संपर्काच्या साधनांचा सुकाळ झालाय. एका क्लिकवर आपण कोणाशीही कनेक्ट होऊ शकतोय, पण हे कनेक्शन मनांना कनेक्ट करते का? मोठमोठ्या शहरांत लाखो माणसे आपल्या आजूबाजूला असतात, तरीही वॉट्स अॅप, फेसबुकच्या जमान्यात अनेकांना एकटेपणाने ग्रासलेय! शहरातल्या या भेसूर एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी निर्माते विनोद मलगेवार यांचा ‘लॉस्ट अँड फाउंड' हा २९ जुलैला प्रदर्शित होणारा आगामी चित्रपट नक्कीच पाहायला हवा. खरे तर निर्माते विनोद मलगेवार हे १०-१५ वर्षांपासून कॅलिफोर्नियाला स्थायिक झाले आहेत. मराठी मातीपासून जरी ते दूर असले, तरी मराठी मातीशी असलेली आपली नाळ त्यांनी तुटू दिली नाही. उत्तम मराठी कलाकृतीला ते कायमच प्रोत्साहन देत आले आहेत. लेखक ऋतुराज धालगडे यांच्या सुंदर कथेतून त्यांनी ‘लॉस्ट अँड फाउंड’ या अत्यंत हटके चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात लेखक-दिग्दर्शक ऋतुराज धालगडे यांनी हा विषय खूपच मार्मिकपणे मांडला आहे. शिवाय, सिद्धार्थ चांदेकर, स्पृहा जोशी, मंगेश देसाई, डॉ. मोहन आगाशे, शुभांगी दामले, तेजस्वी पाटील या कलाकारांनीसुद्धा या विषयाला योग्य तो न्याय दिला आहे. पाहू आपलेही काही हरवलेले गवसतेय का या चित्रपटात.
एकटेपणावर उपाय‘लॉस्ट अँड फाउंड’
By admin | Updated: July 28, 2016 02:05 IST