Join us

सोहेलची पत्नी सीमा खानने घर सोडले ?

By admin | Updated: February 19, 2016 14:25 IST

रणबीर-कतरिना, फरहान-अधुना यांच्यानंतर आता सलमानचा लहान भाऊ सोहल आणि सीमा खान यांच्या नात्यात दुरावा आल्याची बातमी आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १९ - बॉलिवुडमध्ये सध्या ब्रेकअपचा बहर आला आहे. रणबीर-कतरिना, फरहान-अधुना यांच्यानंतर आता सलमानचा लहान भाऊ सोहल आणि सीमा खान यांच्या नात्यात दुरावा आल्याची बातमी आहे. आधी सलमानचाच भाऊ अरबाज आणि त्याची पत्नी मलायका अरोरा खान विभक्त होणार असल्याची बातमी आली होती. मात्र नंतर दोघांमी यावृत्ताचे खंडन केले होते. 
 
आता सलमानचा छोटा भाऊ सोहेलच्या सुखी वैवाहीक आयुष्यात सर्व काही आलबेल नसल्याची बातमी आहे. डीएनच्या वृत्तानुसार सोहेलची पत्नी सीमाने बांद्रयातील सोहेलचे घर सोडले असून, ती आई-वडिलांबरोबर रहात आहे. मागच्या आठवडयात सलमानची बहिण अर्पिता खानचा गोदभराईचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला सीमा कुठेही दिसली नाही. त्यानंतर सीमाने सोहेलचे घर सोडल्याची बातमी आली. 
 
सोहेल-सीमामधील या दुराव्याला अभिनेत्री हुमा कुरेशी जबाबदार असल्याची चर्चा आहे. सोहेलची हुमाशी वाढलेली जवळीक या दुराव्याला कारणीभूत आहे. दोघांकडून अद्यापही याबद्दल काहीही अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.