Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोहा-कुणालचेशुभमंगल

By admin | Updated: December 5, 2014 08:57 IST

सोहा अली खान आणि कुणाल खेमू लवकरच विवाहबद्ध होत आहेत. येत्या २५ जानेवारीला सोहा आणि कुणाल यांचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आल्याचे कळते

सोहा अली खान आणि कुणाल खेमू लवकरच विवाहबद्ध होत आहेत. येत्या २५ जानेवारीला सोहा आणि कुणाल यांचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आल्याचे कळते. सूत्रांनुसार कुणाल आणि सोहा २५ जानेवारीला लग्न करत आहेत; पण त्यांचे लग्न खूपच साध्या पद्धतीने होणार आहे. या लग्नाला कुटुंबाचे जवळचे नातेवाईक आणि काही मित्रांचीच उपस्थिती असणार आहे; पण खान-टागोर कु टुंबातील लग्न साधे कसे काय असू शकेल. करिना सैफच्या लग्नातही काही निवडक लोक सहभागी झाले होते; पण लग्नसोहळा मात्र शानदार ठरला. सोहा आणि कुणाल यांनी साध्या लग्नसोहळ्याचा विचार केला असला, तरी सोहळाही शानदार असेल, अशी अपेक्षा आहे.