Join us

सोशल हबवर मराठी कलाविश्व

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

मराठी नाटकांतील वेगवेगळे प्रवाह आणि प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवरील अपडेट्स देण्यासाठी तसेच नाटकांची माहिती तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी झलक मराठी

मराठी नाटकांतील वेगवेगळे प्रवाह आणि प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवरील अपडेट्स देण्यासाठी तसेच नाटकांची माहिती तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी झलक मराठी या सोशल मीडिया हबची निर्मिती करण्यात आली.यात झलक ANDROID APP, www.zalakmarathi.com वेबसाइट, झलकचे फेसबुक पेज, TWITTER, Youtube Page याचा समावेश आहे. मराठी व्यावसायिक नाटक, प्रायोगिक नाटक, संगीत कार्यक्रम, नाट्य स्पर्धा (एकांकिका, दीर्घांक, २ अंकी), काव्य संमेलन, ट्रेक्स यांची माहिती आताच्या घडीला सोशल मीडियाद्वारे रसिकांपर्यंत पोहोचवली जाते. झलक ANDROID APP. आता जरी हे APP ANDROID  वर असले, तरी लवकरच ते Windows आणि IOS मध्ये उपलब्ध केले जाणार आहे.APP डाऊनलोड करून Install करताना शहर विचारले जाते. पुढील ७ दिवसांत सादर होणाऱ्या व्यावसायिक नाटकांचे वेळापत्रक आणि नाटकांव्यतिरिक्त होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली जाते. एखाद्या नाट्य संस्थेने आपल्या नाटकाच्या प्रमोशनसाठी जर फोटो किंवा व्हिडीओ दिले असतील, तर तेसुद्धा प्रदर्शित केले जातात. ज्या नाट्य संस्थांची परवानगी आहे त्यांच्या नाटकाचं आॅनलाइन आणि फोन बुकिंग ही सुविधाही दिलेली आहे. ‘झलक’चा मुख्य उद्देश रसिक प्रेक्षकांना एक खिडकी बुकिंग करता यावे.मेनमध्ये फिल्टर उपलब्ध करून देण्यात आला आहे. नाटकाच्या नावावरून किंवा नाट्यगृहावरून सर्च पर्याय दिलेला आहे. चालू नाटकांमध्ये आता व्यावसायिक रंगभूमीवर सुरू असणाऱ्या सर्व नाटकांची यादी माहितीसह दिलेली आहे. आगामी नाटक सदरात येणाऱ्या काळात प्रदर्शित होणाऱ्या नाटकांची माहिती आणि जाहिरात दिली जाते. स्पर्धा पर्यायात महाराष्ट्रात विविध ठिकाणी होणाऱ्या सर्व नाट्य स्पर्धांची माहिती, प्रवेशअर्ज, स्पर्धांचे वेळापत्रक आणि निकाल प्रसिद्ध केले जातात. शॉर्ट फिल्म्समध्ये मराठीतील शॉर्ट फिल्म्स प्रदर्शित केल्या जातात. CD –DVDs पर्यायात मराठी चित्रपटांचे प्रमोशनल व्हिडीओ प्रदर्शित केले जातात. ट्रेक सदरात महाराष्ट्रात आयोजित होत असेल्या ट्रेक्सची माहिती दिली जाते. घडामोडीमध्ये कलाविश्वात घडणाऱ्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात मराठी कलारसिकांना दिल्या जातात.