सैफ अली खान आणि शाहरुख खान ‘कल हो ना हो’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यांनतर मात्र या दोघांनी एकत्र काम केले नाही. शाहरुखच्या चित्रपटात काम करणो म्हणजे त्याच्या मोठय़ा चित्रपटात छोटीशी भूमिका साकारण्यासारखे आहे, असे सैफचे मत आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्यापेक्षा स्वत:च्या होमप्रोडक्शन चित्रपटात मुख्य भूमिका साकारायला आवडेल, असे तो सांगतो. ‘सेकंड लीडहून मेन लीडवर येण्यासाठी मला खूप काम करावे लागले आहे. आता मला पुन्हा मागे जायचे नाही,’ असे सैफ म्हणतो. विशेष म्हणजे ‘ओंकारा’सारख्या चित्रपटात लोकप्रिय रोल देणा:या विशाल भारद्वाजसोबत सैफने पुन्हा काम केले नाही. याबाबत सैफ सांगतो की, ‘विशालला ‘ओंकारा’पेक्षा काहीतरी वेगळे लिहावे लागणार आहे. ते फार चांगले नसले तरी वेगळे नक्कीच असावे, नाहीतर लोक प्रत्येक गोष्टीची तुलना ‘ओंकारा’शी करतील.’