Join us
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून सल्लूने दिला ‘बाजीराव मस्तानी’ला नकार

By admin | Updated: July 20, 2015 02:18 IST

रणवीर सिंह, प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोन हे त्रिकूट संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’साठी काम करीत आहे.

रणवीर सिंह, प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोन हे त्रिकूट संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’साठी काम करीत आहे. चित्रपटाचे पोस्टर लाँच झाले, सर्वत्र त्या पोस्टरचे कौतुक होऊ लागले; पण तुम्हाला हे माहीत आहे का? भन्साळीने बाजीरावसाठी सलमान खानची निवड केली होती. सलमान-करिना मुख्य भूमिकेत आणि राणी मुखर्जी मस्तानीच्या भूमिकेत अशी निवड करण्यात आली. त्यानंतर ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटानंतर त्याची कथित गर्लफ्रेंड ऐश्वर्या रॉय हिच्यासोबत झालेल्या ब्रेकअपच्या विचाराने त्याने या चित्रपटाला नकार दिला. तोपर्यंत चित्रपटाचे पोस्टरदेखील तयार झाले होते.