ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 20 - दिलखुलास आणि बेधडक वक्तव्ये करुन वादात अडकण्यासाठी प्रसिद्ध असलेला करण जोहरने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'अॅन अनसुटेबल बॉय' आत्मचरित्रामुळे तसेच कंगना रानौतसोबतच्या कोल्डवार मुळे तो चर्चेत होता. नुकत्याच झालेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये शाहरुखसोबत लग्न करायला आवडेल, असे विधान करत करणने नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. कॉन्ट्रोर्व्हसी आणि करण जोहर हे जणूकाही नातेच झाले आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रमातून बॉलिवूड कलाकारांना खुलेपणाने बोलते करणाऱ्या करणने इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारल्या. या कार्यक्रमामध्ये करणला लैंगिकतेसोबतच एक बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आला होता. शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यापैकी तू कोणाशी मैत्री करशील? कोणासोबत लग्न करायला आवडेल? आणि कोणाला मारावेसे वाटेल? असे तीन गमतीशीर प्रश्न त्याला विचारण्यात आले. यावेळी करणने लग्नाच्या प्रश्नावर ऐश्वर्याचे नाव न घेता शाहरुखच्या नावाला पसंती दिली तर, ऐश्वर्या आणि सिद्धार्थला मैत्रीपेक्षा मारायला आवडेल असे तो म्हणाला. यावेळी बोलताना करण जोहरने शाहरुख खान सोबत लग्न करायला का आवडेल याचे कारण देखिल सांगितले. आपल्या बऱ्याचशा चित्रपटामध्ये काम केल्यामुळे नव्हे, तर त्याचा मन्नत बंगला खूपच सुंदर आहे. त्यामुळे शाहरुखसोबत लग्न करायला आवडेल, असे तो म्हणाला. यावेळी त्याला त्याच्या लव्ह लाइफविषयी विचारण्यात आले. करणनेदेखील दिलखुलासपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. तो म्हणाला की, माझे सर्व सिनेमे तुम्हाला एखाद्या ड्रामापेक्षा कमी वाटत नाहीत. कारण मी त्याच सिनेमांची निर्मिती करतो, ज्याची कथा मी माझ्या आयुष्यात अनुभवली आहे. लव्ह लाइफविषयी बोलायचे झाल्यास, मी जिच्यावर प्रेम करत होतो, तिच्या लग्नमंडपात मी उपस्थित होतो.
म्हणून करण जोहरची शाहरुखसोबत लग्न करण्याची इच्छा
By admin | Updated: March 20, 2017 22:24 IST