Join us  

Sidharth Shukla: ...म्हणून सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर ट्रेंड होतोय बालिका वधूचा एपिसोड नं.1157, नेमकं काय आहे त्या भागात?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 5:02 PM

death of Sidharth Shukla, episode no. 1157 of Balika Vadhu : सिद्धार्थ शुक्ला याचा आकस्मिक मृत्यू झाल्याने संपूर्ण मनोरंजन जगताला धक्का बसला आहे. सोशल मीडियावरूनही सिद्धार्थच्या अचानक जाण्याबाबत दु:ख व्यक्त केले जात आहे.

मुंबई - लोकप्रिय टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचा आकस्मिक मृत्यू झाल्याने संपूर्ण मनोरंजन जगताला धक्का बसला आहे. (Sidharth Shukla) सोशल मीडियावरूनही सिद्धार्थच्या अचानक जाण्याबाबत दु:ख व्यक्त केले जात आहे. (Sidharth Shukla Death)सिद्धार्थचा मृत्यू झालाय, यावर कुणाचाही विश्वास बसत नाही आहे. दरम्यान सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याला ज्या शोमधून ओळख मिळाली त्या बालिका वधूमधील एक भाग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बालिका वधू या मालिकेमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि प्रत्युषा बॅनर्जी हे कलाकार झळकले होते. प्रत्युषा बॅनर्जीचा मृत्यू २०१६ मध्ये झाला होता. दरम्यान, बालिका वधू या मालिकेचा ११५७ वा भाग आता व्हायरल होत आहे. यामध्ये दोघांच्याही विवाहाचे दृश्य आहे. (So after the demise of Siddharth Shukla, the trend is on, Episode No. 1157 of Balika Vadhu in Trending)

बालिका वधू या शोमध्ये सिद्धार्थ शिवची आणि प्रत्युषा आनंदीची भूमिका साकारत होते. त्यांच्या विवाहाचे चित्रिकण ११५७ व्या भागात करण्यात आले होते. यावेळी विवाहामधील अनेक विधी आणि काही रोमँटिक गमती-जमतीही दाखवण्यात आल्या होत्या. यामध्ये आनंदी शिवला कलेक्टर साहेब या नावाने हाक मारताना दिसत होत्या. 

लोकप्रिय टीव्ही मालिका असलेल्या बालिका वधू या मालिकेमधील तीन पात्रे आता हयात नाहीत. सिद्धार्थ शुक्ला आणि प्रत्युषा बॅनर्जीसोबतच या मालिकेतील दादी सा ची भूमिका निभावणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचेही निधन झाले आहे. काही महिन्यांच्या आजारपणानंतर त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.

मात्र बालिका वधू या मालिकेमधील हा भाग का व्हायरल झाला. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे सिद्धार्थच्या मृत्यूनंत लोक गुगलवर दिवंगत अभिनेत्याचा विवाह आणि कौटुंबिक माहिती शोधत आहेत. शोध घेण्यात येत असलेल्या काही लोकप्रिय विषयांमध्ये त्यांचे कुटुंब, विवाह, पत्नी आणि विवाहाची तारीख यांचा समावेश आहे. त्यामुळे हा भाग व्हायरल झाला असावा. 

टॅग्स :सिद्धार्थ शुक्लाटिव्ही कलाकारमुंबई