Join us
Daily Top 2Weekly Top 5

शूटच्या पहिल्याच दिवशी झाले स्नेहाचे रॅगिंग

By admin | Updated: May 4, 2016 01:38 IST

‘लाल इश्क’ चित्रपटात एक सुंदर चेहरा पाहायला मिळणार आहे. या नव्या हिरोईनचे नाव आहे स्नेहा चव्हाण. करिअरच्या सुरुवातीलाच एवढा मोठा चित्रपट मिळल्याने ती खूश आहे.

‘लाल इश्क’ चित्रपटात एक सुंदर चेहरा पाहायला मिळणार आहे. या नव्या हिरोईनचे नाव आहे स्नेहा चव्हाण. करिअरच्या सुरुवातीलाच एवढा मोठा चित्रपट मिळल्याने ती खूश आहे. याबद्दल ती सांगते की, ‘लाल इश्कच्या संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा अनुभव धमाल आणि अविस्मरणीय होता. आम्ही सेटवर भरपूर मस्ती करायचो आणि तितकीच खादाडीसुद्धा. प्रथमच सिनेमात काम करीत असल्याने मस्ती म्हणून सर्वांनी माझं रॅगिंग करायचं ठरवलं. माझा पहिला सीन शूट करण्याच्या वेळेस सर्वांनी मला सांगितलं, कॅमेरामनला पहिल्यांदा १०१ रुपये देऊनच सीनला सुरुवात करायची आणि मी खरोखरच १०१ रुपये कॅमेरादादांना दिले व मागून सर्व जण खूप हसत होते. हा धमाल क्षण मी कधीच विसरू शकणार नाही.’ सिनेमातील पहिल्यावहिल्या ब्रेकबद्दल ती म्हणाली की, ‘संपूर्ण झक्कास हिरॉईन टीमची आभारी आहे. त्यांनी मला ही सुवर्णसंधी दिली. स्वप्निल जोशी हा नायक आणि संजय लीला भन्साली यांचा मराठी सिनेमा यापेक्षा मोठं व्यासपीठ माझ्यासाठी असूच शकत नाही. स्वप्ना वाघमारेदिग्दर्शित आणि शबिना खाननिर्मित लाल इश्क हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. सिनेमात मी सेकंड लीड आहे. श्रेया असं भूमिकेचं नाव आहे.’