काही प्राणी असे असतात ज्यांचे अॅट्रॅक्शन बऱ्याच जणांना असते. असेच अॅट्रॅक्शन सई ताम्हणकरला कोअलाबद्दल वाटते. आता हा कोअला कोण, असे जर वाटत असेल, तर तो आॅस्ट्रेलियात आढळणारा एक प्राणी आहे. मोठ्या खारुताईसारखा दिसणारा हा कोअला सईचा फेव्हरेट अॅनिमल आहे, असे तीच सांगते. सईला तिच्या या लाडक्या प्राण्याला पाहून त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. झाडावर चढलेला तो कोअला सईकडे पाहत असून, सई मात्र फोटोसाठी पाऊट करून पोझ देण्यातच बिझी होती.
सई-कोअलाचा झक्कास फोटो
By admin | Updated: March 5, 2016 01:21 IST