Join us

मस्तानीसोबत झळकणार स्माइल क्वीन

By admin | Updated: August 6, 2016 01:54 IST

मराठमोळी स्माइल क्वीन म्हणजे रेणुका शहाणे लवकरच बॉलीवूडची ‘मस्तानी’ दीपिका पदुकोणसोबत झळकणार आहे.

मराठमोळी स्माइल क्वीन म्हणजे रेणुका शहाणे लवकरच बॉलीवूडची ‘मस्तानी’ दीपिका पदुकोणसोबत झळकणार आहे. हा चित्रपट नाही, तर एक जाहिरात आहे. ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना रेणुका म्हणाली, ‘‘दीपिकासोबत काम करताना मजा आली. तिचे मला खूप-खूप कौतुक वाटते. ती एकदम बॅलन्स मुलगी आहे. ओम शांती ओम चित्रपटानंतर खूप परिपक्व झाली आहे. सेटवरदेखील ती सगळ्यांशी छान वागते. मी बऱ्याच दिवसांनंतर कोणत्या तरी बॉलीवूडच्या कलाकारासोबत जाहिरातीत काम केले आहे. दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांची मी आणि माझी आई जबरदस्त चाहते आहोत. रक्षाबंधनाच्या काळात ही जाहिरात कदाचित प्रेक्षकांसमोर येईल.’’