दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटी अनेकांसाठी आकर्षणाचा विषय. अनेकांच्या मनात ही फिल्मसिटी आणि इथं होणाऱ्या सिनेमांच्या शूटिंगबद्दल कमालीची उत्सुकता असते. त्यामुळे ही फिल्मसिटी पाहण्यासाठी चाहत्यांची पाऊलं आपसुकच इथं वळतात. हीच बाब ध्यानात घेऊन मुंबई दर्शनच्या धर्तीवर दादासाहेब फाळके चित्रनगरी दर्शन ही अनोखी संकल्पना सुरु करण्यात आली. रसिक आणि पर्यटकांचाही त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय. मात्र त्याच वेळी फिल्मसिटीत विविध मालिका तसंच सिनेमांचं शूटिंगही सुरु असतं. यावेळी कलाकारांना पाहून रसिक आणि पर्यटकांना आनंद होतच असणार. मात्र, कलाकारांना याविषयी काय वाटतं, रसिक आणि पर्यटक यांना फिरवणारी गाडी यामुळे त्यांच्या शूटिंगमध्ये खंड पडतो का, असे अनेक प्रश्न आहेत. काही कलाकारांना यामुळे त्रास होत असणार. मात्र काही कलाकार रसिकांच्या आनंदातच आपला आनंद मानतात. या मोजक्या कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर. या सगळ्या फिल्मसिटी टूरकडे त्रास म्हणून न पाहता त्यातही तिला एक भन्नाट गंमत सुचली. यासाठी तिनं स्वत:सोबत घडलेला एक प्रसंग सोशल मीडियावर शेअर केलाय. फिल्मसिटीत फिरणाऱ्या टूरच्या गाड्या पाहून गंमत वाटत असल्याचे स्मिताने शेअर केलंय. या गाड्यांमधून जेव्हा लोक फिरतात, आम्हाला बघतात त्यावेळी वेगळीच मजा असते असं स्मिताने नमूद केलंय. इतर कलाकारांना याचा त्रास होत असला तरी आपण या गोष्टीचा आनंद घेत असल्याचंही तिने म्हटलंय. ज्यावेळी लोक गाडीतून आम्हाला बघतात, खुश होतात त्या वेळी प्राणिसंग्रहालयात असल्याचा भास होतो असं स्मिताने म्हटले आहे. तेव्हा आपण जणू काही प्राणिसंग्रहालयातील प्राणी असून लोक आपल्याला बघायला आलेत असं वाटत असल्याची गमतीशीर पोस्ट स्मिताने शेअर केलीय.
स्मिताला होतोय प्राणी संग्रहालयात असल्याचा भास
By admin | Updated: May 22, 2017 02:04 IST