Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदाचे सिक्स पॅक अ‍ॅब्ज

By admin | Updated: November 20, 2014 00:30 IST

बॉलीवूडच्या अभिनेत्यांमध्ये सिक्स पॅक अ‍ॅब्जचे चलन आहे. पुनरागमन करणारा गोविंदाही यात मागे नाही.

बॉलीवूडच्या अभिनेत्यांमध्ये सिक्स पॅक अ‍ॅब्जचे चलन आहे. पुनरागमन करणारा गोविंदाही यात मागे नाही. गोविंदाने त्याच्या हॅप्पी एंडिंग या आगामी चित्रपटात त्याचे सिक्स पॅक अ‍ॅब्ज दाखवले आहेत. सलमानच्या पावलावर पाऊल टाकत गोविंदाही आता शर्टलेस होणार आहे. हा सीन गोविंदाने करावा म्हणून निर्मात्यांना त्याची बरीच समजूत घालावी लागली. या चित्रपटात गोविंदा एका सुपरस्टारच्या भूमिकेत आहे. २१ नोव्हेंबरला रिलीज होणाऱ्या हॅप्पी एंडिंग या चित्रपटात सैफ अली खान, इलियाना जी क्रूज, कल्की कोचलीन आणि रणवीर शौरी मुख्य भूमिकेत आहेत.