Join us
Daily Top 2Weekly Top 5

'डंकी' मधील गायक शानचं गाणं का हटवलं? स्वत:च दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, 'राजू हिरानींनी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 14:27 IST

शानचे चाहते मात्र नाराज झालेत

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट गाणी देणारा गायक शान (Shaan) सध्या चर्चेत आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या शाहरुखच्या खानच्या (Shahrukh Khan) 'डंकी' (Dunki) सिनेमात शानचं एक गाणं होतं. मात्र फायनल एडिटमध्ये ते गाणंच हटवण्यात आलं. याबाबत शानने ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं आहे. तरी शानचे चाहते मात्र यामुळे नाराज झाले आहेत. 

शानने ट्विटरवर लिहिले, 'मी इथे फक्त माझ्या गाण्याबद्दल बोलू इच्छितो की ते गाणं फिल्मचा भाग का बनू शकलं नाही. श्रेया घोषालसोबत हे एक सुंदर ड्युएट आहे. दूर कही दूर गाण्याचं रेकॉर्डिंग सुद्धा काश्मीरमध्ये झालं आणि ते तिथेच चित्रीतही झालं. पण एडिट टेबलवर राजू हिरानी यांचाच तो निर्णय होता(बराच विचार केल्यानंतर). त्यांनी मला खूप स्पष्टपणे सांगितलं होतं की हे गाणं फिल्मचा भाग का नाही होऊ शकत आणि मी याचा आदर करतो. मी समजू शकतो की त्यांच्यासाठी त्यांचा सिनेमाच सर्वप्रथम प्राधान्य आहे. मला आशा आहे त्यांच्या आगामी सिनेमांमध्ये हे गाणं ऐकायला मिळेल. पण सध्या डंकी मध्ये ते मिळणार नाही.'

 शानच्या या ट्वीटवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले,'मी हे ऐकून खूप दु:खी आहे. असं वाटतंय आमच्यापासून एक खूप सुंदर गाणं हिरावून घेतलं. आशा आहे आम्हाला हे गाणं लवकरच ऐकायला मिळेल. किंवा याचा ऑडिओ जरी रिलीज केला तरी चांगलं होईल.'

तर आणखी एकाने लिहिले,'आम्हाला तुमचं गाणं ऐकायचं होतं. कदाचित ते स्क्रीनप्लेला सूट झालं नाही. पण हिरानी यांच्या आगामी सिनेमात ते नक्कीच असेल कारण हिरानी जीनियस आहेत.'

'डंकी' सिनेमा कालच सर्वत्र प्रदर्शित झाला. राजकुमार हिरानी आणि शाहरुखची जादू या सिनेमात बघायला मिळत आहे. प्रेक्षक सिनेमाला भरभरुन प्रतिसाद देत आहेत.

टॅग्स :शानडंकी' चित्रपटराजकुमार हिरानीशाहरुख खान