Sikandar Song BTS: अभिनेता सलमान खानच्या आगामी 'सिकंदर' या सिनेमाची त्याच्या चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. चाहत्यांच्या लाडक्या भाईजानचा २०२४ मध्ये एकही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. यामुळे सलमानचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झालं आहे आणि तो ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. पण, चित्रपटाचा ट्रेलर अद्याप प्रदर्शित झालेला नाही. ट्रेलरआधीच 'जोहरा जबीं' हे गाणं लाँच झालं आहे. गाण्यात रश्मिका मंदान्ना आणि सलमान खानची केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. प्रदर्शित झाल्यापासून हे गाणं ट्रेंडमध्ये आहेत. अशातच आता या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ समोर आला आहे.
'जोहरा जबीं' गाण्याच्या BTS व्हिडीओमध्ये सलमान आणि रश्मिकासह संपूर्ण टीमची मेहनत स्पष्टपणे दिसून येते. हे गाणं शूट करताना अनेक रिटेक घ्यावे लागल्याचं पाहायला मिळतंय. या गाण्यातील डान्स फराह खानने कोरिओग्राफर केला आहे. BTS व्हिडिओमध्ये सुंदर असा सेट दिसून येत आहे. यात सलमान स्वतःच्या कामावर हसताना दिसतोय. तो म्हणतो, "मी ते इतके वाईट करतेय की सगळे फक्त माझ्याकडेच पाहत आहेत". सलमान खान त्याच्या डान्स स्टेप्स विसरल्याचंही व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. हा BTS व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.