Join us  

2 तासांच्या ग्रँड प्रीमिअरमध्ये त्याच्यासाठी 2 मिनिटंही नव्हती का?  ‘बिग बॉस 15’वर भडकले फॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 4:51 PM

Bigg Boss 15 : तुमचा शो फ्लॉप होवो... इतके भडकले फॅन्स की, दिल्या शिव्याशाप

ठळक मुद्देसिद्धार्थ हा बिग बॉस 13 चा विजेता होता. या सीझनने इतिहास रचला होता. आत्तापर्यंतच्या बिग बॉसच्या इतिहासातील हा सर्वाधिक यशस्वी सीझन  ठरला होता.

बिग बॉस’चा 15 वा (Bigg Boss 15) सीझन सुरू झालायं. काल (2 ऑक्टोबर) या शोचा ग्रँड प्रीमिअर पार पडला. सलमान खान (Salman Khan) पुन्हा ‘बिग बॉस 15’चा होस्ट बनून स्टेजवर आला. एकापाठोपाठ एक स्पर्धकांची धमाकेदार एन्ट्री झाली. पण एक गोष्ट मात्र मिसींग होती. ती म्हणजे सिद्धार्थ शुक्लाची आठवण. होय,‘बिग बॉस 15’च्या प्रीमिअरमध्ये सिद्धार्थ शुक्लाच्या स्मृतीला उजाळा देत त्याला श्रद्धांजली वाहिली जाईल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण ‘बिग बॉस 15’च्या प्रीमिअरमध्ये कोणालाही सिद्धार्थ शुक्लाची (Sidharth Shukla) आठवण झाली नाही. नेटकरी यावरून चांगलेच भडकले. सोशल मीडियावर अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली.सिद्धार्थ हा बिग बॉस 13 चा विजेता होता. या सीझनने इतिहास रचला होता. आत्तापर्यंतच्या बिग बॉसच्या इतिहासातील हा सर्वाधिक यशस्वी सीझन  ठरला होता. यामागचं कारण होतं सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल या जोडीची कमाल.विशेषत: सिद्धार्थ शुक्ला या सीझनचा ‘वन मॅन आर्मी’ होता. त्याच्या जोरावर या सीझनने कधी नव्हे इतका टीआरपी मिळवला होता. खुद्द बिग बॉसनेही याची कबुली दिली होती.

 

गेल्या 2 सप्टेंबर सिद्धार्थ शुक्लाचं अकाली निधन झालं. त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून चाहते अद्यापही सावरलेले नाहीत. काल सिद्धार्थच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला. अशात ‘बिग बॉस 15’मध्ये आपल्या लाडक्या सिद्धार्थला श्रद्धांजली अर्पण केली जाईल, त्याच्या आठवणी ताज्या केल्या जातील, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. पण सलमान खान व मेकर्सला याचा पुरता विसर पडला. यामुळे संतप्त चाहत्यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिल्यात.

‘सिद्धार्थ शुक्लाला साधी श्रद्धांजली नाही. तुमचा शो फ्लॉप होणार. कारण तुम्ही जंगलाच्या राजालाच विसरलात. आता मी या शोचा तिरस्कर करतो,’अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली.‘बिग बॉस इतकाही शिष्टाचार नाही, असं वाटलं नव्हतं. आजच्या प्रीमिअरमध्ये सिद्धार्थ शुक्लाचा साधा उल्लेखही केला नाही. तुम्हाला टीआरपी मिळावा म्हणून तो केवळ 2 दिवसांत रूग्णालयातून थेट शोमध्ये परतला होता,’अशी संतप्त कमेंट एका युजरने केली. अनेक नेटकºयांनी अशाच आशयाच्या प्रतिक्रिया दिल्यात.

टॅग्स :बिग बॉससिद्धार्थ शुक्लासलमान खान