Join us

Sid-Kiara Wedding:लाडक्या सूनबाईंचं सासरी होणार दणक्यात स्वागत, जाणून घ्या कोण-कोण आहे कियाराच्या सासरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 16:37 IST

आज कियाराचा सिद्धार्थच्या दिल्लीतल्या घरी गृह प्रवेश होणार आहे. लाडक्या सूनबाईंच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली आहे.

Sidharth Malhotra-Kiara Advani Marriage:  सिद्धार्थ मल्होत्रा(Sidharth Malhotra) व कियारा अडवाणी (Kiara Advani)  हे बॉलिवूडचं क्यूट कपल काल लग्नबंधनात अडकलं. राजस्थानच्या जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या. सिद्धार्थ व कियाराने लग्नाचे काही सुंदर फोटोही शेअर केले आहेत. वधूवराच्या पोशाखात दोघंही कमालीचे सुंदर दिसत होते. लग्नानंतर सिड आणि कियारा ८ फेब्रुवारीला म्हणजेच आज संध्याकाळी दिल्लीला परतणार आहेत. सून म्हणून कियाराचा दिल्लीतील तिच्या सासरच्या घरी पहिला दिवस असेल. कियाराच्या सासरच्या घरात कोणते सदस्य आहेत हे जाणून घेऊया.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे कुटुंब फार मोठे नाही. सिद्धार्थ मल्होत्रा ​​हा दिल्लीचा रहिवासी असून तो पंजाबी कुटुंबातील आहे. सिद्धार्थने दिल्लीच्या बॉस्को स्कूलमधून शिक्षण घेतले आहे, तर सिद्धार्थ मल्होत्राने दिल्ली विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा  मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते. आई रीमा मल्होत्रा गृहिणी आहे. सिद्धार्थ मोठा भाऊ हर्षद मल्होत्रा ​​खूप मोठा बँकर आहे. त्यांची पत्नी पौर्णिमा गृहिणी आणि समाजसेविका त्याचा लाडका पुतण्या अधिराज मल्होत्रा ​​असे अभिनेत्याचे कुटुंब आहे. 

रिपोर्टनुसार सिद्धार्थ मल्होत्राच्या कुटुंबीयांनी कियारा अडवाणीच्या स्वागतासाठी खास नियोजन केले आहे. सूनबाईंचं स्वागतासाठी सिद्धार्थचे कुटुंबीय शानदार परफॉर्मन्स देणार आहेत. लग्नानंतर सिड-कियाराचं लग्नाचं रिसेप्शन ९ फेब्रुवारीला दिल्ली आणि १२ फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे.

 

टॅग्स :कियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्रा