Join us

आज होणार सिद्धार्थची दुल्हनिया कियाराचा गृह प्रवेश, दिल्लीमध्ये देणार ग्रँड रिसेप्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 14:13 IST

वधूवराच्या पोशाखात दोघंही कमालीचे सुंदर दिसत होते. आता सगळ्यांच्या नजरा या जोडप्याच्या रिसेप्शनकडे लागल्या आहेत.

 सिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणी हे बॉलिवूडचं क्यूट कपल काल लग्नबंधनात अडकलं. राजस्थानच्या जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या. सिद्धार्थ व कियाराने लग्नाचे काही सुंदर फोटोही शेअर केले आहेत. वधूवराच्या पोशाखात दोघंही कमालीचे सुंदर दिसत होते. यावेळी सिद्धार्थ गोल्डन एम्ब्रॉयडरीसह ऑफ-व्हाइट शेरवानीमध्ये दिसला, तर कियाराने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी आता सगळ्यांच्या नजरा या जोडप्याच्या रिसेप्शनकडे लागल्या आहेत. 9 फेब्रुवारीला सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्याचे सर्व नातेवाईक, जवळचे मित्र आणि इतर सेलिब्रिटींसाठी रिसेप्शन पार्टी देणार आहे. रिसेप्शननंतर 10 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि कियारा दिल्लीहून मुंबईला रवाना होतील. यानंतर १२ फेब्रुवारीला मुंबईत सर्वांसाठी रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे.

आज संध्याकाळी सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी चार्टर्ड फ्लाइटने दिल्लीला रवाना होतील, सिद्धार्थच्या घरी नवी नवरी कियाराचा गृहप्रवेश होईल.

कियारा आणि सिद्धार्थच्या  शाही विवाह सोहळ्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे.राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेस हा जैसलमेर शहरापासून १६ किलोमीटर दूर असून हा पॅलेस ६५ एकर परिसरात पसरलेला आहे. हा पॅलेस भारतातल्या टॉप १५ वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. या पॅलेसमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी त्यांच्याकडून आकारण्यात येणारे भाडेही खूप आहे. जर एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी लग्न करण्यासाठी १ कोटी २० लाख रुपये भाडे आकारले जाते. तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यादरम्यान हा आकडा २ कोटींपर्यंत जातो. या पॅलेसमध्ये २५० स्क्वेअर फूट रुममध्ये एक दिवस राहण्यासाठी २० ते ३० हजार रुपये भाडे आकारण्यात येते. या हॉटेलमधील लक्झरी रूम्ससाठी एका दिवसाला ४० ते ५० हजार भाडे आकारले जाते.त्यानुसार सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात तीन दिवसांसाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :कियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्रा