स ध्या बॉलीवूडमध्ये अशा अनेक जोड्या काम करत आहेत की ज्यांनी याअगोदर कधीही एकत्र काम केले नाही. त्यात महत्त्वाची जोडी म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ. ‘बार बार देखो’मध्ये ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकत्र शूटिंग करत असताना सिद्धार्थला कतरिनाविषयी एक सिक्रेट गोष्ट कळाली. वेल, आता ती कोणती? म्हणून विचार सुरू झाला ना डोक्यात? ती सिक्रेट गोष्ट सांगताना तो म्हणतो, ‘कतरिना ही तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. ‘पॅक अप’ झाल्यावरही ती काम करत राहते. आम्ही फार थकून गेलेलो असतो. ती काय खाते आणि तिचे डाएट सध्या कसे आहे, याकडे तिचे फार लक्ष असते.’ ‘बार बार देखो’ चित्रपट रोमँटिक असून तो याअगोदर ‘कपूर अॅण्ड सन्स’मध्ये दिसला होता.
सिद्धार्थला कळाले कतरिनाचे ‘एक’ सिक्रेट !
By admin | Updated: July 7, 2016 02:53 IST