Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थने केले व्हॉट्सअ‍ॅप बंद

By admin | Updated: March 10, 2016 01:31 IST

आजकालच्या सोशल मीडियाच्या जगात व्हॉट्स अ‍ॅपने प्रत्येकाला वेड लावून ठेवले आहे. जो तो मोबाईलवर व्हॉट्स अ‍ॅपमध्ये बिझी असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्हॉट्स अ‍ॅप एके व्हॉट्स अ‍ॅप.

आजकालच्या सोशल मीडियाच्या जगात व्हॉट्स अ‍ॅपने प्रत्येकाला वेड लावून ठेवले आहे. जो तो मोबाईलवर व्हॉट्स अ‍ॅपमध्ये बिझी असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्हॉट्स अ‍ॅप एके व्हॉट्स अ‍ॅप. आजची तरुणाई तर व्हॉट्स अ‍ॅप है तो सबकुछ है. अशाच अ‍ॅटिट्यूडमध्ये जगत असतात. पण या व्हॉट्स अ‍ॅपच्या दुनियेत विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता सिद्धार्थ जाधवने मात्र व्हॉट्स अ‍ॅप बंद केले आहे. याबाबत लोकमत सीएनएक्सशी बोलताना सिद्धार्थ म्हणाला, मी व्हॉट्स अ‍ॅपला ६५ ते ६६ ग्रुपमध्ये अ‍ॅड होतो. विनाकारण यावर माझा खूप वेळ वाया जात होता. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅप ही माझ्यासाठी एक अनावश्यक व वेळखाऊ गोष्ट आहे. व्हॉट्स अ‍ॅपमुळे व्यक्तींमधील संवाद कमी झाला आहे. व्हॉट्स अ‍ॅपमुळे माणूस स्वत:ला व नात्यांनादेखील हरवत चालला आहे. त्यामुळे गेले एक ते दीड वर्ष झाले माझे व्हॉट्स अ‍ॅप मी बंद करून ठेवले आहे. पण माझ्या शाळेतील बालपणीच्या मुलांचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप माझ्या पत्नीच्या मोबाईलवर सुरू ठेवला आहे.