Join us  

बापलेकाचं नातं! व्हिलचेअरवर असलेल्या वडिलांची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 10:47 AM

'योद्धा' सिनेमाच्या प्रिमियरला सिद्धार्थने कुटुंबीयांसह फोटोसाठी पोझही दिल्या. पण, त्याच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या 'योद्धा' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात सिद्धार्थ मुख्य भूमिका साकारत आहे. नुकताच या सिनेमाचा प्रिमियर शो पार पडला. 'योद्धा'च्या प्रिमियरला सिद्धार्थ मल्होत्राचे कुटुंबीयही उपस्थित होते. सिद्धार्थची पत्नी आणि अभिनेत्री कियारा अडवाणीसह त्याच्या आईवडिलांनीही 'योद्धा'च्या प्रिमियर शोला हजेरी लावली होती. या प्रिमियर सोहळ्यातील काही व्हिडिओ समोर आले आहेत. 

'योद्धा' सिनेमाच्या प्रिमियरला सिद्धार्थने कुटुंबीयांसह फोटोसाठी पोझही दिल्या. पण, त्याच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. प्रिमियरला आलेले सिद्धार्थचे वडील हे व्हिलचेअरवर होते. सिद्धार्थ त्यांची पूर्णपणे काळजी घेताना दिसला. त्याचा प्रिमियर सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिलचेअरवर असलेल्या वडिलांना सिद्धार्थने दिलेल्या वागणुकीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. विरल भय्यानी या पापाराझी पेजवरुन सिद्धार्थचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. "हा जेन्टलमॅन आहे", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "म्हणून हा माझा फेव्हरेट आहे," असं म्हटलं आहे. सिद्धार्थबरोबर कियाराही कुटुंबीयांची काळजी घेताना दिसून आली. 

'योद्धा' चित्रपटात एका योद्ध्याची कथा दाखवण्यात आली आहे. जो विमान हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढतो आणि विमानात उपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप परत आणतो. या योद्ध्याच्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा ​​दिसणार असून तो एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थबरोबर या सिनेमात दिशा पटानी, राशी खन्ना हे कलाकार आहेत. हा सिनेमा १५ मार्चला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणीसिनेमा