Join us  

‘दे धक्का 2’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला, जाधव फॅमिलीची धम्माल मोठ्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 11:54 AM

‘दे धक्का 2’ आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, शिवाजी साटम असे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहे

De Dhakka 2: ‘दे धक्का’ (De Dhakka ) हा सिनेमा 2008 साली प्रदर्शित झाला होता आणि या सिनेमावर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. एका क्रेझी कुटुंबाची कथा बघताना प्रेक्षक भान विसरले होते. ‘दे धक्का’ला मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता, या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची अर्थात ‘दे धक्का 2’ची (De Dhakka 2) चर्चा सुरू झाली होती. तर आता ‘दे धक्का 2’ आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच तो चर्चेत आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता आहे. 

मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, शिवाजी साटम असे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहे. या प्रत्येक कलाकाराचा स्वतंत्र असा चाहतावर्ग असल्यामुळे आपल्या लाडक्या कलाकाराला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. ‘दे धक्का’ चित्रपटातील जवळपास सगळेच कलाकार ‘दे धक्का 2’मध्येही दिसून येणार आहेत. ‘दे धक्का 2’मध्ये सुद्धा मकरंद जाधव आणि कुटुंबीय त्यांच्या जुन्या धमाल अंदाजात पुन्हा भेटीला येणार आहेत. अर्थात यावेळी जरा वेगळा ट्विस्ट आहे. चित्रपटाची कथा दूर लंडनमध्ये घडतेय. जाधव कुटुंबिय राणीच्या देशात मज्जा मस्तीच्या मूडमध्ये असताना त्यांच्यावर एक नवं संकट कोसळतं. आता या संकटातून जाधव फॅमिली कशी बाहेर येते आणि संकटाला दे धक्का म्हणत कशी पुढे जाते ते चित्रपटात दिसणार आहे.

 एकूणच मकरंद जाधव आणि त्याची बायको सुमती, मुलगी सायली, मुलगा किस्ना, अतरंगी जावई धनाजी, हेमल्या आणि तात्यांची धम्माल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. महेश मांजरेकर सुद्धा सिनेमात एका भूमिकेत दिसून येणार आहे

टॅग्स :दे धक्का 2सिद्धार्थ जाधवशिवाजी साटम