Join us

आजची प्रजासत्ताक दिनाची सकाळ अशी होती...; सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 16:27 IST

Siddharth Chandekar : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने नुकताच लग्नाचा वाढदिवस साजरा केला आणि या सेलिब्रेशननंतर लगेच भ्रमंतीवर निघाला.

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने (  Siddharth Chandekar) नुकताच लग्नाचा वाढदिवस साजरा केला आणि या सेलिब्रेशननंतर लगेच भ्रमंतीवर निघाला. होय, सध्या सिद्धार्थ मध्यप्रदेशातील  कान्हा नॅशनल टायगर रीझर्व्ह फॉरेस्टमध्ये जंगल भ्रमंती करतोय. 

प्रजासत्ताक दिनानिमित्तानं सिद्धार्थनं जंगल सफारीचा प्लान केला आणि त्याचा हा प्लान चांगलाच फत्तेही झाला. होय, प्रजासत्ताक दिनी जंगल सफारीदरम्यान सकाळी सकाळी  त्याला वाघोबाचं दर्शन झालं.  एक वाघीण त्याच्या गाडीच्या समोर आली आहे अन् त्यानं लगेच तिला आपल्या कॅमे-यात कैद केलं. हा फोटो सिद्धार्थनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘आजची प्रजासत्ताक दिनाची सकाळ अशी होती़ राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय प्राणी रस्ता ओलांडताना दिसला... हे खरं होतं.., अशा आशयाचं कॅप्शन सिद्धार्थनं या फोटोला दिलं आहे.

जंगल सफारीदरम्यान एक व्हिडीओही सिद्धार्थनं शेअर केला आहे.

सिद्धार्थने वर्षभरापूर्वी अभिनेत्री मिताली मयेकर हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. दोघंही गोरेगाव पूर्व येथील म्हाडा कॉलनीत राहतात़ त्यांच्या घरामागे आरेचे जंगल आहे. त्यामुळे या परिसरात क्वचित जंगली प्राण्यांचंही दर्शन घडतं. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या खिडकीतून बिबट्याचं दर्शन घडलं होतं. यानंतर झाडीतून डोकावणारं हरीणही दिसलं होतं. सिद्धार्थने या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. 

आमच्या बिल्डींगच्या मागे आज एक पाहुणा आला. बराच वेळ आमच्याकडे टक लावून बघत बसला आणि नंतर झुडूपात निघून गेला. त्याच्या नजरेतून कळत होतं स्पष्ट की पाहुणा तो नाही आम्ही आहोत. हे त्याचं घर आहे, अशी सिद्धार्थची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.सिद्धार्थ सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. बायको मितालीसोबतचे अनेक विनोदी व्हिडीओ शिवाय फोटो तो शेअर करत असतो.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकर