Join us
Daily Top 2Weekly Top 5

असे काय घडले की, सिद्धांत चर्तुवेदीने पकडला दिग्दर्शकाचा गळा, व्हिडिओ झाला व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 18:31 IST

सिद्धांतचे हे रूप पाहून त्याच्या चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ठळक मुद्देसिद्धांतनेच सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या बॅकराऊंडला थ्री इडियट चित्रपटातील बहेती हवा सा था वो... हे गाणे आपल्याला ऐकू येत आहे...

सिद्धांत चतुर्वेदी गली बॉयमुळे चर्चेत आला होता. यात आलिया भट, रणवीर सिंग आणि कल्की कोचलिन यासारखे कलाकार असतानाही त्याने त्याची वेगळी ओळख निर्माण केली होती. सिद्धांतला या चित्रपटामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली असून तो सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी नेहमीच संपर्कात असतो.

सिद्धांत लवकरच शकुन बत्राच्या आगामी चित्रपटात दिसणार असून या चित्रपटाचे नाव अजून गुलदस्त्यात आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव काय असणार याची उत्सुकता केवळ सामान्य लोकांनाच नव्हे तर सिद्धांतला देखील लागली आहे. त्यामुळे त्याने या चित्रपटाचे नाव जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. सिद्धांतला नाव न कळल्याने तो चक्क दिग्दर्शकाचा गळा दाबताना दिसत आहे.

सिद्धांतनेच सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या बॅकराऊंडला थ्री इडियट चित्रपटातील बहेती हवा सा था वो... हे गाणे आपल्याला ऐकू येत आहे... तर शकुन सिद्धांतला नाव सांगत नसल्याने तो त्याचा गळा दाबून त्याला खाली पाडत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाचे नाव कळत नाही तोपर्यंत शकुन बत्राचा आगामी चित्रपट असेच म्हणावे लागेल असे सिद्धांतने सोशल मीडियाद्वारे या पोस्टमध्ये सांगितले आहे. 

टॅग्स :सिद्धांत चतुर्वेदी