Join us

तीन अ‍ॅक्शन हीरोंसोबत श्रुती

By admin | Updated: November 4, 2014 08:56 IST

अभिनेत्री श्रुती हसन तिच्या आगामी तीन चित्रपटांमध्ये तीन अ‍ॅक्शन स्टार्ससोबत काम करताना दिसणार आहे.

अभिनेत्री श्रुती हसन तिच्या आगामी तीन चित्रपटांमध्ये तीन अ‍ॅक्शन स्टार्ससोबत काम करताना दिसणार आहे. ‘गब्बर’मध्ये अक्षय कुमार, ‘वेलकम बॅक’मध्ये जॉन अब्राहम, आणि ‘यारा’मध्ये विद्युत जामवाल श्रुतीचा हीरो असणार आहे. हे तिन्ही कलाकार अ‍ॅक्शन हीरो असून, त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईलसाठी ओळखले जातात. अक्षय एक सुपरस्टार फायटर आहे, तर जॉनची मॅचो मॅनची इमेज आहे. दुसरीकडे विद्युतही मार्शल आर्टमध्ये पारंगत आहे. या तिन्ही अ‍ॅक्शन हीरोंसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने श्रुती सध्या जास्तच खुश आहे. या आनंदामागचे कारण म्हणजे पुढचे काही दिवस तिच्याशी कोणीही पंगा घेऊ शकणार नाही. कारण या तिघांपैकी एक जण तिच्यासोबत नेहमीच असणार आहे.