दाक्षिणात्य ब्युटी श्रुती हसन ही तिचे व्यक्तिमत्त्व, अभिनय, आणि सादरीकरण यांच्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा ‘वेलकम बॅक’मधील अभिनय हा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. सध्या ‘सिंगम ३’ या तेलगू चित्रपटासाठी विशाखापट्टणम येथे शूटिंग करते आहे. यात तिने पत्रकाराची भूमिका साकारली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘श्रुतीच्या भूमिकेचे नाव विद्या असून, ती सुरीयाला मोठ्या केसमध्ये अडकण्यापासून वाचवते.’ या महिनाअखेरपर्यंत श्रुती ‘एस ३’साठी शूटिंग करणार आहे. त्यानंतर, ती वडील कमल हसन यांच्या ‘सबाश नायडू’मध्ये काम करणार आहे. हरी दिग्दर्शित ‘एस ३’ हा ‘सिंगम’ चा तिसरा भाग आहे, ज्यात अनुष्का शेट्टी ही महत्त्वाच्या भूमिकेत होती.
‘सिंघम ३’मध्ये श्रुती हसन बनणार पत्रकार !
By admin | Updated: July 11, 2016 01:32 IST