मराठी इंडस्ट्रीतील तगड्या अभिनेत्री अमृता सुभाष, प्रार्थना बेहरे, तेजश्री प्रधान यांच्यापाठोपाठ आता श्रुती मराठेदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ती ‘बुधिया सिंग-बॉर्न टू रन’ या बॉलिवूड चित्रपटात बॉलिवूडचा तगडा अभिनेता मनोज वाजपेयीसोबत झळकणार आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना श्रुती म्हणाली, ‘‘बुधिया सिंग या ५ वर्षांच्या मुलावर आधारित हा चित्रपट आहे. २००६ या वर्षी बुधिया खूप चर्चेत होता, कारण एवढ्या लहान वयात बुधिया ४८ मॅरेथॉन धावला होता. याच बुधियाच्या कोचची भूमिका मनोज वाजपेयीने केली आहे. तर, त्यांच्या पत्नीची म्हणजेच गीताची भूमिका मी केली आहे. तसेच मनोज वाजपेयी यांच्यासारख्या मोठ्या कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव खरंच खूप छान होता. एवढा मोठा नट समोर असतानादेखील त्याने ते जाणवू दिले नाही, हीच त्याची खासीयत आहे. आमचे खूप छान सीन आहेत. ते तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळतील.’’
बॉलीवूडमध्ये श्रुतीचे पदार्पण
By admin | Updated: June 25, 2016 01:15 IST
मराठी इंडस्ट्रीतील तगड्या अभिनेत्री अमृता सुभाष, प्रार्थना बेहरे, तेजश्री प्रधान यांच्यापाठोपाठ आता श्रुती मराठेदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे
बॉलीवूडमध्ये श्रुतीचे पदार्पण
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}