Join us

श्रेयस बनवणार सिक्वेल

By admin | Updated: March 17, 2015 23:35 IST

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सिक्वेलची धूम सुरू आहे. अग बाई अरेच्चा, टाईमपास २ या चित्रपटांबरोबरीनेच श्रेयस तळपदेच्या पोश्टर बॉईज या चित्रपटाचाही सिक्वेल बनणार आहे.

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सिक्वेलची धूम सुरू आहे. अग बाई अरेच्चा, टाईमपास २ या चित्रपटांबरोबरीनेच श्रेयस तळपदेच्या पोश्टर बॉईज या चित्रपटाचाही सिक्वेल बनणार आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या पोश्टर बॉईजने तिकीटबारीवर चांगला गल्ला जमवला होता. त्यामुळे या चित्रपटाची हिंदी आवृत्ती काढण्याच्या विचारात होतो. मात्र लोकांच्या आग्रहास्तव आता पोश्टर बॉईजचा सिक्वेल बनवण्याचा विचार असल्याचे श्रेयस तळपदेने सांगितले.