Join us

'पोश्टर बॉईज'च्या सीक्वलमध्ये दिसणार तेच कलाकार : श्रेयस तळपदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 08:00 IST

नसबंदीसारखा आगळा-वेगळा पण महत्त्वपूर्ण विषय 'पोश्टर बॉईज' चित्रपटात रेखाटण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या सिनेमाचा सीक्वल येणार आहे.

ठळक मुद्दे'पोश्टर बॉईज'चा येणार लवकरच सीक्वलसीक्वलमध्ये असणार पहिल्या भागातीलच कलाकार - श्रेयस

नसबंदीसारखा आगळा-वेगळा पण महत्त्वपूर्ण विषय 'पोश्टर बॉईज' चित्रपटात रेखाटण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता श्रेयस तळपदेने या सिनेमाची निर्मिती केली होती. ऋषिकेश जोशी, दिलीप प्रभावळकर आणि अनिकेत विश्वासराव यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा तरुणांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा चित्रपट खूप भावला. त्यानंतर आता या सिनेमाचा सीक्वल येणार आहे. 

'पोश्टर बॉईज' या सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर जवळपास चार वर्षांनी श्रेयस पुन्हा आता या सिनेमाच्या सीक्वलची तयारी करतो आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, श्रेयस म्हणाला, लवकरच आम्ही 'पोश्टर बॉईज'चा सीक्वल घेऊन येत आहोत. यासाठी आम्ही तयारीला लागलो आहोत. सिनेमाचा विषय फायनल झाला असून फक्त स्क्रीनप्ले आणि संवाद यांच्यावर अजून काम सुरु आहे. जर तारखा वगैरे सर्वकाही सुरळीत सुरु झाले तर आम्ही लवकरच या सीक्वलच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहोत आणि पुढच्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत हा सिनेमा रिलीजही करू. श्रेयस पुढे म्हणाला की, ''पोश्टर बॉईज'चा सीक्वलसुद्धा पहिल्या भागाप्रमाणे धम्माल-मस्ती घेऊन येईल. तसेच सामाजिक संदेशसुद्धा देईल पण यावेळेस तो थोडा हटके असेल आणि प्रत्येकाला आपल्या जवळचा वाटेल. सिनेमाच्या सीक्वलमध्ये पहिल्या भागातीलच कलाकार असतील तर मी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.'

'पोश्टर बॉईज' चित्रपटाचा सीक्वल पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. 

 

 

 

 

टॅग्स :श्रेयस तळपदे