Join us
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टफिल्म उत्तम प्लॅटफॉर्म

By admin | Updated: October 8, 2015 05:27 IST

मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे ‘अहिल्या’ या तिच्या शॉर्टफिल्ममुळे मागच्या काही दिवसांत चर्चेत होती. शॉर्टफिल्मबाबत बोलताना राधिका म्हणाली, ‘अनुभवासाठी

मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे ‘अहिल्या’ या तिच्या शॉर्टफिल्ममुळे मागच्या काही दिवसांत चर्चेत होती. शॉर्टफिल्मबाबत बोलताना राधिका म्हणाली, ‘अनुभवासाठी आणि आपल्यातले टॅलेंट दाखविण्यासाठी शॉर्टफिल्म हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. मोठी गुंतवणूक नसल्यामुळे यात वेगवेगळे प्रयोग करणे सहज शक्य आहे.’ २००५ साली ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या राधिकाने आतापर्यंत खूप वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. त्याच त्याच प्रकारच्या भूमिका वारंवार करायला तिला आवडत नाही. अनुराग कश्यप, अनुराग बसू, सुजॉय घोष, श्रीराम राघवन, हर्ष, केतन मेहता, लीना यादव या दिग्दर्शकांसोबत पुन्हा एकदा काम करायला आवडेल, असे राधिकाने सांगितले.