‘विक्की डोनर’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी यामी गौतम प्रभुदेवाच्या ‘अॅक्शन जॅक्सन’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग यामीला आॅस्ट्रेलियातील कडाक्याच्या थंडीत करावे लागले. विशेष म्हणजे या गाण्यात यामीने साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज घातले होते. अजय देवगणसोबत असलेल्या या गाण्याचे शूटिंग १० अंश सेल्सियस तापमानात करण्यात आले. कडाक्याच्या या थंडीत अजयने स्वेटर घातले होते. त्यामुळे परीक्षा तर यामीची होती. थंडी सहन करीत यामीने ही परीक्षा पास केली. त्यामुळे दिग्दर्शकानेही तिचे कौतुक केले. प्रभुदेवाचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात अजय देवगणसह सोनाक्षी सिन्हा, कुणाल रॉय कपूर मुख्य भूमिकेत आहेत.
कडाक्याच्या थंडीत यामीने केले शूटिंग
By admin | Updated: November 18, 2014 01:58 IST