आजकाल प्रेक्षकांना जे अस्सल अन् खरं पडद्यावर दाखविले जाते, तेच भावते. उगाचच सिनेमाची कथा रंगविण्यासाठी त्यामध्ये ओतण्यात येणाऱ्या मसाल्याचा आता लोकांनादेखील कंटाळा येऊ लागला आहे. आपले प्रेक्षक हे नक्कीच सुजाण असल्याने त्यांना रिअल गोष्टी पाहण्यात जास्त रस असल्याचे दिसून येते आणि म्हणूनच आजचा मराठी सिनेमांचा विषय लोकांपर्यंत पोहोचत आहे, त्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. यासाठी कलाकारांपासून ते दिग्दर्शकांपर्यंत संपूर्ण सिनेमाची टीम झटत असते. आता आगामी ‘गणवेश’ या सिनेमाच्या संदर्भातदेखील असेच काही झाले आहे. दिग्दर्शक अतुल जगदाळे जेव्हा या सिनेमाची कथा लिहीत होते, तेव्हा त्यांना डोळ्यांसमोर वीटभट्टीवर काम करणारी एक बाई दिसत होती. आता ही बाई स्मितामध्ये उतरविण्यासाठी त्यांनी रिअल लोकेशनवर जाऊन म्हणजेच चक्क वीटभट्टीवर जाऊन तो रिअल फील येण्याकरिता शूटिंग केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर वीटभट्टीवर काम करणाऱ्या बाईचे जीवन जाणून घेण्यासाठी स्मिता तांबे अन् अतुल जगदाळे दोघेही त्या बाईला भेटले, त्यांचे दैनंदिन जीवन, कामाचे स्वरूप या सर्व गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला. आता या दोघांचीही ही मेहनत प्रेक्षकांना किती भावतेय, ते लवकरच समजेल.
वीटभट्टीवर जाऊन केले ‘गणवेश’चे शूटिंग
By admin | Updated: June 19, 2016 03:54 IST