Join us  

'शिवरायांचा छावा' सिनेमातलं बहिर्जी नाईकांच्या मोहीमेवर आधारीत नवं गाणं भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 1:14 PM

'शिवरायांचा छावा' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमातलं नवीन गाणं भेटीला आलंय

 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. या सिनेमात शंभूराजे अर्थात शिवपुत्र संभाजी महाराजांच्या पराक्रमाची  गाथा बघायला मिळणार आहे. काहीच दिवसांपुर्वी रिलीज झालेल्या सिनेमाच्या टीझर अन् ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय संभाजी महाराजांच्या (Sambhaji Maharaj) राज्याभिषेक सोहळ्यावर आधारित नव्या गाण्यालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशातच  'शिवरायांचा छावा' सिनेमातलं 'वारा गं मंदी वार' हे नवं गाणं भेटीला आलंय. 

स्वराज्याचे गुप्तहेर अशी ओळख असलेल्या बहिर्जी नाईकांच्या मोहिमेवर आधारित हे गाणं भेटीला आलंय. 'वारा गं मंदी वार' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे आठवड्यातल्या सातही वारांवर आधारित या गाण्याचे शब्द भन्नाट आहेत. याशिवाय मल्हारी, बजरंगबली या देवांची प्रार्थना सुद्धा गाण्यात करण्यात आलीय.  गाण्यात शंभूराजांना आर्त साद घालण्यात आलीय.

बहिर्जी नाईक कायमच गाण्यामधील सांकेतिक शब्दांचा वापर करुन माहिती पोहचवत असत. त्यामुळे याही गाण्यात बहिर्जी नाईकांची अनोखी मोहिम दिसतेय. सिनेमात बहिर्जी नाईकांच्या भूमिकेत अभिनेते रवी काळे झळकणार आहेत. याशिवाय अभिनेत्री दिप्ती लेले सुद्धा गाण्यात दिसतेय.  'शिवरायांचा छावा' सिनेमा १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजसंभाजी राजे छत्रपती