Join us  

शिवानी सुर्वेच्या 'थोडं तुझं थोडं माझं'मध्ये लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री! रिएलिटी शोमध्येही घेतलेला सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 10:12 AM

स्टार प्रवाहवरील 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत लोकप्रिय मराठी अभिनेता पुन्हा एकदा मालिकाविश्वात कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे (shivani surve)

काहीच दिवसांपुर्वी 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेची घोषणा झाली. या मालिकेच्या निमित्ताने लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे ९ वर्षांनी स्टार प्रवाहच्या मालिकेत झळकणार आहे. शिवानी सुर्वेची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेचा प्रोमो नुकताच भेटीला आला. या प्रोमोला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आता या मालिकेसंबंधी आणखी एक महत्वाची अपडेट मिळतेय ती म्हणजे.. या मालिकेत मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता झळकणार आहे.

'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत अभिनेता समीर परांजपेची एन्ट्री होणार आहे. हो तुम्ही बरोबर ऐकताय. समीर परांजपे म्हणजे सर्वांचा लाडका अभ्या अर्थात अभिमन्यू. समीरने 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत साकारलेली ही भूमिका चांगलीच गाजली. नंतर समीर 'सूर नवा ध्यास नवा' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. आता समीर  'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत शिवानी सुर्वेसोबत प्रमुख भूमिका साकारणार आहे.

'देवयानी' मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहची नवी मालिका 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मधून शिवानी तब्बल ९ वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. 'थोडं तुझं आणि थोडं माझं' १७ जूनपासून रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :शिवानी सुर्वेस्टार प्रवाह