Join us  

'तुला शिकवीन...' फेम शिवानी अन् कविता मेढेकर यांच्या पहिल्या भेटीचा इंटरेस्टिंग किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 9:04 AM

मृणालची सून असं म्हणत कविता दोघांचं अभिनंदन करायला स्टेजवर गेल्या आणि...

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहे. शिवानी रांगोळे (Shivani Rangole), कविता मेढेकर (Kavita Medhekar) आणि हृषिकेश शेलार (Hrishikesh Shelar) मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. कविता लाड या 'भुवनेश्वरी' च्या भूमिकेत आहेत तर शिवानी ही अक्षराची भूमिका साकारत आहे. पण तुम्हाला माहितीए का शिवानीची कविता मेढेकर यांच्यासोबत पहिली भेट कधी झाली? त्यांच्या भेटीचा किस्सा फारच इंटरेस्टिंग आहे.

अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा (Mrinal Kulkarni) मुलगा विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) याच्यासोबत शिवानी रांगोळेने काही महिन्यांपूर्वीच लग्नगाठ बांधली. सेलिब्रिटी कट्टाला दिलेल्या मुलाखतीत कविता यांनी शिवानीसोबतचा पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. दोघांच्या लग्नात कविता मेढेकर देखील आल्या होत्या. मृणालची सून असं म्हणत कविता दोघांचं अभिनंदन करायला स्टेजवर गेल्या. त्यांनी शिवानीला हात मिळवत अभिनंदन असे म्हटले. तर शिवानी त्यावर म्हणाली, 'मला तुम्ही खूप आवडता.' 

मुलाखतीत शिवानी म्हणाली, 'मी असं बोलून त्यांना खूपच ऑकवर्ड केलं होतं. मी त्यांना थँक यू वगैरे काहीच नाही म्हणले. नंतर काही दिवसांनी कळलं की आम्ही एकत्र काम करतोय. सेटवर आमचं बॉंड मस्त जुळलं.'

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. नेहमीच्या मालिकांपेक्षा एक वेगळी कथा या मालिकेत बघायला मिळत आहे. कविता मेढेकर बऱ्याच दिवसांनी टेलिव्हिजनवर दिसत असल्याने चाहत्यांनाही आनंद होतोय.

टॅग्स :कविता लाडशिवानी रांगोळेमराठी अभिनेताटिव्ही कलाकार