Join us  

ईडीकडून कारवाई होताच आईसह शिल्पा शेट्टी नेमकी कुणाच्या घरी गेली? जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 11:10 AM

ईडीकडून कारवाई झाल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिची आई सुनंदासोबत प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी पोहचली.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) वर अंमलबजावणी संचालनालय (Directorate of Enforcement) कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीनं राज कुंद्रा याची  ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त (Property Seized) केली आली आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टी अडचणीत सापडली आहे. ईडीकडून करवाई झाल्यानंतर शिल्पानं थेट लोकप्रिय अभिनेत्याचं घर गाठलं. 

शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये शिल्पा आणि तिची आई सुनंदा या दोघी दिसून येत आहे. दोघीही अभिनेता सलमान खानच्या  वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दिसून येत आहे. शिल्पा ही सलमान खानच्या घरी जाताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ईडीच्या कारवाईनंतर शिल्पा सलमानकडे मदत मागण्यासाठी गेली असल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.  

राज कुंद्रावरी ईडीच्या या कारवाईमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरून गेलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राज कुंद्रा याच्यावर कारवाई केली. जुहूमधील शिल्पा शेट्टी यांच्या नावे असलेला फ्लॅट, पुण्यातील बंगला तसेच इक्विटी शेअर्सही ईडीकडून जप्त करण्यात आला आहे. त्यामुळं कुंद्रा दाम्पत्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता पुन्हा एकदा शिल्पा शेट्टी अडचणीत सापडली आहे. 

दरम्यान सलमान खानच्या घरावर रविवारी (१४ एप्रिल रोजी) पहाटे गोळीबार झाला होता या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगच्या अनमोल बिश्नोईने घेतली होती. तेव्हापासून अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आहे. सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्या दोघांनाही गुजरातमधील भुज येथून सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :शिल्पा शेट्टीसेलिब्रिटीबॉलिवूडसलमान खानराज कुंद्रा