Join us

शिल्पा शेट्टीने शेअर केला मुलीसोबतचा व्हिडिओ, पहिल्यांदाच दिसली मुलीची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 19:07 IST

या व्हिडिओत आपल्याला तिच्या मुलीची झलक पाहायला मिळत असून हा व्हिडिओ शिल्पाच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

ठळक मुद्देशिल्पाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत शिल्पा बसलेली असून तिच्या हातात तिची चिमुकली आहे. शिल्पा तिच्या चिमुकलीसोबत गप्पा मारताना दिसत असून तिच्या चिमुकलीला गुलाबी रंगाचा छान फ्रॉक आणि त्यावर मॅचिंग हेअर बँड घातलेला आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरी एका नन्ही परीचे आगमन झाले असून त्यांनीच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांना सांगितली होती. या बातमीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. आता शिल्पाची मुलगी दोन महिन्याची झाली असून तिने तिच्यासोबतचा एक क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत आपल्याला तिच्या मुलीची झलक पाहायला मिळत असून हा व्हिडिओ शिल्पाच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

शिल्पाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत शिल्पा बसलेली असून तिच्या हातात तिची चिमुकली आहे. शिल्पा तिच्या चिमुकलीसोबत गप्पा मारताना दिसत असून तिच्या चिमुकलीला गुलाबी रंगाचा छान फ्रॉक आणि त्यावर मॅचिंग हेअर बँड घातलेला आहे. या व्हिडिओसोबत शिल्पाने लिहिले आहे की, माझ्यासाठी १५ हा आकडा खूपच चांगला असून आज म्हणजेच १५ एप्रिलला माझी मुलगी दोन महिन्यांची झाली आहे तसेच टिकटॉकवर आजच माझे १५ मिलियन फॉलोव्हर्स झाले आहेत. माझ्या परिवारावर नेहमीच प्रेम करण्यासाठी तुमचे सगळ्यांचे आभार...

शिल्पा आणि राज यांना १५ फेब्रुवारीला मुलगी झाली असून हे त्यांचे दुसरे अपत्य आहे. शिल्पा आणि राज यांची ही मुलगी सरोगसीच्या माध्यमातून झालेली आहे.

शिल्पाने इन्स्टाग्रामवर या नन्ही परीचा फोटो शेअर करत लिहिले होते की, देवाने आमच्या प्रार्थना ऐकल्या असून आमच्या आयुष्यात एक चमत्कार घडला आहे. आम्हाला सगळ्यांना आनंद होत आहे की, आमच्या आयुष्यात एका नन्ही परीचे आगमन झाले आहे. तिचे नाव आम्ही समिशा शेट्टी कुंद्रा असे ठेवले आहे. तिचा जन्म १५ फेब्रुवारी २०२० ला झाला असून आमच्या घरात आता ज्युनिअर एसएसके आली आहे.

राज कुंद्राने ट्वीट करत सांगितले होते की, ही बातमी सांगायला मला किती आनंद होत आहे हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आमच्या घरात एका नव्या सदस्याचे आगमन झाले असून आमच्या मुलीचे नाव समीशा शेट्टी कुंद्रा असे आहे. शिल्पा आणि राज यांचे लग्न नोव्हेंबर २००९ मध्ये झाले. त्यांना वियान नावाचा मुलगा असून मे २०१२ मध्ये त्याचा जन्म झाला आहे.

टॅग्स :शिल्पा शेट्टी